सध्या देशातील कोरोना संसर्गात घट होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २ हजार ४०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे.
एकीकडे देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तरी दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात २१ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. १५ ऑक्टोबर रोजी १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी १४ ऑक्टोबर रोजी २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची ही आकडेवारी चिंताजनक आहे.