>> मोदींना पत्रदेशाची अखंडता धोक्यात
हिंदी भाषेचे सक्तीकरण करणे म्हणजे देशाच्या विभाजनाला चालना देण्यासारखे आहे. हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे देशाची अखंडता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे पत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हिंदीचे सक्तीकरण म्हणजे भाषा युद्ध लादण्यासारखे असल्याचे स्टॅलिन यांनी पुढे म्हटले आहे.
संसदीय समितीच्या हिंदी सक्तीकरणाच्या शिफारशीमुळे हिंदी भाषा न बोलणार्या लोकांत भीती निर्माण झाल्याचे या पत्रात स्टचॅलिन यांनी नमूद केले आहे.
केंद्रीय विद्यालयाच्या सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देणे बंधनकारक करण्याची शिफारस संसदेतील कार्यालयीन भाषा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्याच आधारावर काही राज्यांमध्ये उच्च शिक्षणामध्ये हिंदीचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये आता हिंदी भाषेतून वैद्यकीय शिक्षण देण्यास आरंभ केला आहे.