सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात (डीए)मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली असून, आता महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के झाला आहे. मागील १ जुलै २०२२ पासून वाढीव या भत्त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचार्यांना नोव्हेंबर महिन्यापासून डीएची थकबाकी दिली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.