>> जिल्हा पंचायत पोटनिवडणूक; आज होणार अर्जांची छाननी
राज्यातील जिल्हा पंचायतींच्या १६ ऑक्टोबर रोजी होणार्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एकूण १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची शुक्रवार दि. ७ ऑक्टोबरला छाननी केली जाणार आहे.
उत्तर गोव्यातील रेईश मागूश मतदारसंघातून एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात भाजपचे संदीप बांदोडकर, कॉँग्रेसच्या प्रगती संदीप पेडणेकर, अपक्ष राजेश दाभोलकर आणि साईनाथ कोरगावकर यांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवार राजेश दाभोलकर यांनी आपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या दवर्ली मतदारसंघातून एकूण १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात भाजपकडून परेश पांडुरंग नाईक, कॉँग्रेसकडून लियोन्सियो रायकर, आपकडून सिद्धेश भगत आणि अँड्र्यू रिबेलो, भगवान रमेश रेडकर, जुझे डायस, कपिल देसाई, मुर्तूझा कोगनूर, मायला रोचा, पूजा नाईक यांनी अर्ज भरले आहेत.
कुठ्ठाळी मतदारसंघातून पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात कॉँग्रेसकडून वेलंट बार्बोझा, आपकडून जॉन डिसा आणि मर्सियाना वाझ, लेस्ली गामा, अनिता डिसोझा यांनी अर्ज दाखल केले आहेत. मर्सियाना वाझ या कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांच्या पत्नी आहेत.
कदाचित त्याचमुळे भाजपने कुठ्ठाळी मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही.