नागपूर ते गोवा एक्सप्रेस हा नवीन महामार्ग बनविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली.
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर – गोवा महामार्ग बनविला जाणार आहे.
या नवीन महामार्गामुळे नागपूर ते गोवा अंतर कमी होण्यास मदत होणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.