राज्यात मागील दोन दिवसांपासून कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर भारतातून मोसमी पावसाच्या सुरू झालेल्या परतीची गती कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मंदावली आहे. उत्तर पंजाब आणि जवळच्या भागातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोसमी पावसाच्या परतीच्या गतीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारतीतील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० सप्टेंबरपासून उत्तर भारतातून मोसमी पावसाच्या परतीला सुरूवात झाली आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत सर्व भागात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक ०.६२ इंच पावसाची नोंद झाली आहे. ओल्ड गोवा, म्हापसा, फोंडा, पणजी, साखळी, वाळपई, काणकोण, मडगाव, मुरगाव, सांगे, केपे, दाबोली या भागात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.