जमीन घोटाळा प्रकरणी राजकुमारला पुन्हा अटक

0
8

गोवा पोलिसांच्या एसआयटीने जमीन घोटाळा प्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यामध्ये राजकुमार मेथी याला काल अटक केली. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने राजकुमार मेथी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. जमीन हडपल्या प्रकरणी राजकुमार मेथी याला यापूर्वी दोन प्रकरणांमध्ये अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.