>> काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झालेली असून त्याचा परिणाम म्हणून कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत गोव्यातील काही भागात अतिमुसळधार तर काही भागात मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज दि. ९ व उद्या १० रोजी राज्याला केशरी रंगाचा इशारा देण्यात आला आहे. तर ११ व १२ सप्टेंबर रोजी पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे.
केशरी रंगाचा इशारा हा सावधान राहण्यासाठीचा इशारा असून पिवळा इशारा म्हणजे लक्ष ठेवा असा इशारा आहे. वरील काळात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता असून ताशी ४० कि.मी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
वरील काळात समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छीमारांनी मच्छीमारासाठी समुद्रात जाऊ नये, असे इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
ऑगस्टमध्ये कित्येक दिवस दडी मारल्यानंतर सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.