राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सांगता ६१ पदकांसह केली. भारतीय संघ पदकतक्त्यामध्ये चौथ्या स्थानावर राहिला. भारताने एकूण २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्य असे प्रदर्शन केले. पदकांच्या बाबतीत भारताची ही पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१० साली दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत भारताने सर्वाधिक १०१ पदके जिंकली होती. यानंतर मँचेस्टर, २००२ (६९ पदके), गोल्ड कोस्ट, २०१८ (६६ पदके), ग्लास्गो, २०१४ (६४ पदके) यांचा क्रमांक लागतो. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक भारोत्तोलनात मीराबाई चानू हिने पटकावले तर भारताच्या सुवर्ण मोहिमेची सांगता टेबल टेनिसमध्ये अचंथा शरथ कमल याने केली.
>> राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पदकविजेते
कुस्ती
महिला ५७ किलो ः अंशू मलिक (रौप्य), पुरुष ६५ किलो ः बजरंग पुनिया (सुवर्ण), महिला ६२ किलो ः साक्षी मलिक (सुवर्ण), पुरुष ८६ किलो ः दीपक पुनिया (सुवर्ण), महिला ६८ किलो ः दिव्या काकरान (कांस्य), पुरुष १२५ किलो ः मोहित ग्रेवाल (कांस्य), महिला ५० किलो ः पूजा गेहलोत (कांस्य), पुरुष ५७ किलो ः रवी कुमार दहिया (सुवर्ण), महिला ५३ किलो ः विनेश फोगाट (सुवर्ण), पुरुष ७४ किलो ः नवीन (सुवर्ण), महिला ७६ किलोः पूजा सिहाग (सुवर्ण), पुरुष ९७ किलो ः दीपक नेहरा (कांस्य).
बॅडमिंटन
मिश्र सांघिक (रौप्य), पुरुष एकेरी ः किदांबी श्रीकांत (कांस्य), महिला दुहेरी ः त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद (कांस्य), महिला एकेरी ः पीव्ही सिंधू (सुवर्ण), पुरुष एकेरी ः लक्ष्य सेन (सुवर्ण), पुरुष दुहेरी ः सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी (सुवर्ण).
ज्युदो
महिला ४८ किलो ः सुशीला लिकमाबाम (रौप्य), पुरुष ६० किलो ः विजय कुमार यादव (कांस्य), महिला ७८ किलो ः तुलिका मान (रौप्य)
वेटलिफ्टिंग
महिला ४९ किलो ः मीराबाई चानू (सुवर्ण), महिला ५५ किलो ः बिंद्याराणी देवी (रौप्य), पुरुष ५५ किलो ः संकेत सारगर (रौप्य), पुुरुष ६१ किलो ः गुरुराजा पुजारी (कांस्य), पुरुष ७३ किलो ः अचिंता शेवली (सुवर्ण), पुरुष ६७ किलो ः जेरमी लालरिनुंगा (सुवर्ण), महिला ७१ किलो ः हरजिंदर कौर (कांस्य), पुरुष ९६ किलो ः विकास ठाकूर (रौप्य), पुरुष १०९ किलो ः लवप्रीत सिंग (कांस्य), पुरुष १०९ किलोंवरील ः गुरप्रीत सिंग (कांस्य).
बॉक्सिंग
पुरुष ९२ किलोंवरील सुपर हेविवेट ः सागर अहलावत (रौप्य), महिला ५० किलो लाईट फ्लायवेट ः निखत झरीन (सुवर्ण), पुरुष ५१ किलो फ्लायवेट ः अमित पांघल (सुवर्ण), महिला ४८ किलो मिनिमम वेट ः नीतू घांगस (कांस्य), पुरुष ६७ किलो वॉल्टरवेट ः रोहित टोकास (कांस्य), पुरुष ५७ किलो फेथरवेट ः मोहम्मद हुसामुद्दीन (कांस्य), महिला ६० किलो लाईटवेट ः जास्मिन लांबोरिया (कांस्य).
टेबल टेनिस
पुरुष टेबल टेनिस संघ (सुवर्ण), पुरुष दुहेरी ः शरथ कमल व जी. साथियान (रौप्य), पॅरा महिला एकेरी ः भाविना पटेल (सुवर्ण), पॅरा महिला एकेरी ः सोनलबेन पटेल (कांस्य), पुरुष एकेरी ः जी. साथियान (कांस्य), पुरुष एकेरी ः शरथ कमल (सुवर्ण)
लॉन बॉल
महिला लॉन बॉल संघ (सुवर्ण), पुरुष लॉन बॉल संघ (रौप्य)
पुरुष तिहेरी उडी
एलथॉस पॉल ः सुवर्ण, अब्दुल्ला अबूबाकर ः रौप्य
१०००० मीटर चालणे
पुरुष ः संदीप कुमार (कांस्य), महिला ः प्रियांका गोस्वामी (रौप्य)
स्क्वॉश
पुरुष एकेरी ः सौरव घोषाल (कांस्य), मिश्र दुहेरी ः सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल (कांस्य)
पुरुष ३००० मीटर अडथळा
अविनाश साबळे (रौप्य)
पॅरा पॉवर लिफ्टिंग
पुरुष हेविवेट ः सुधीर (सुवर्ण)
मुरली श्रीशंकर ः रौप्य
महिला संघ ः कांस्य, पुरुष संघ ः रौप्य
क्रिकेट
महिला संघ (कांस्य)
उंच उडी
तेजस्विन शंकर (कांस्य)
पुरुष ३००० मीटर अडथळा
अविनाश साबळे (रौप्य)
महिला भालाफेक
अन्नू राणी (कांस्य)
बॅडमिंटनपटूंकडून सुवर्णकमाई
इंग्लंडच्या बर्मिंगहममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरीस ६१ पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले. १७८ पदकांसह ऑस्ट्रेलियाने पहिले, १७६ पदकांसह इंग्लंडने दुसरे आणि ९२ पदकांसह कॅनडाने तिसरे स्थान मिळवले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
भारताचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग याला मात देत विजय मिळवला.
बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.