सडा-मुरगाव येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या

0
18

सडा येथील मुरगाव पत्तन प्राधिकरण प्रशासन इमारती मागील परिसरात काल एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

मुरगाव सडा येथील बसस्थानकाच्या बाजूस राहणारी परप्रांतीय कुटुंबातील सदर अल्पवयीन मुलगी आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए) प्रशासन इमारतीच्या मागे असलेल्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. या घटनेची माहिती मिळताच मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत व इतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात पाठविला.

दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीला सडा भागातील नागरिकांनी बुधवारी दुपारी १२.४५ च्या दरम्यान चालत जाताना पाहिले होते. त्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास ती गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. सदर मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. तिचे वडील रोजंंदारीवर काम करीत आहेत.