पंचायत निवडणुकांसाठी दुसर्‍या दिवशी ७० उमेदवारी अर्ज दाखल

0
12

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी ७० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याआधी सोमवारी १० अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या ८० वर पोहोचली आहे.

पंचायत निवडणुकांसाठी दुसर्‍या दिवशी उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यांतून ९, डिचोलीतून ११, बार्देशमधून १५, तिसवाडीतून ४ अर्ज दाखल करण्यात आले. दक्षिण गोव्यातील ङ्गोंडा तालुक्यातून ८, सांगेतून ३, सासष्टीतून ११, मुरगावातून २, केपेतून ५ आणि काणकोणमधून २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ग्रामपंचायत निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार्‍या चार याचिकांवर बुधवार दि. २० जुलैला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे.