राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याच्या पूर व्यवस्थापनाशी संबंधित माहिती हॅकर्सनी काल हॅक केली. ही माहिती जारी करण्यासाठी क्रिप्टो करन्सीची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी सायबर गुन्हा विभागाने अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या जलस्रोत खात्याच्या वेबसाईटच्या व्यवस्थापनाचे काम करणार्या सॉफ्टवेअर कंपनीसोबत सायबर गुन्हा विभाग तपास करीत आहे.