आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना काल आणखी एक झटका बसला. इंधन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले असून, कालपासूनच ही दरवाढ लागू झाली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पणजीत एका सिलिंडरसाठी १०७० रुपये, तर उर्वरित राज्यात १०६७ रुपये मोजावे लागणार आहेत.
५० रुपयांच्या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. मुंबईमध्ये १ हजार ५२ रुपये, कोलकात्यामध्ये १ हजार ७९ रुपये आणि चेन्नईमध्ये या सिलिंडरचा दर १ हजार ६८ रुपयांवर पोहोचला आहे.