>> माविन गुदिन्होंचा टॅक्सीवाल्यांना इशारा
राज्यातील टॅक्सीवाल्यांनी आता तरी आपला हट्ट सोडून मीटरचा वापर करावा आणि मीटरचा वापर न करता ग्राहकांना भरमसाठ भाडे आकारून ङ्गसवण्याचे बंद करावे. अन्यथा सरकारसमोर राज्यात ओला व उबर यांना आणण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नसल्याचा इशारा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गोमंतकीय टॅक्सीवाल्यांना दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील टॅक्सीवाल्यांना आपल्या टॅक्सीत डिजिटल मीटर बसवण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने सर्व टॅक्सीवाल्यांना मोङ्गत मीटरचे वितरण केलेले आहे. मात्र, असे असतानाही हे टॅक्सीवाले मीटरचा वापर न करता ग्राहकांना व विशेष करून राज्यात येणार्या पर्यटकांना भरमसाठ बिले आकारत लुबाडत असल्याचा वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे गोव्यातील टॅक्सीवाल्यांकडून पर्यटकांची होणारी ङ्गसवणूक रोखण्यासाठी सरकारवर आता दिल्लीहूनही दडपण येत आहे. त्यामुळे वेळ निघून जाण्यापूर्वी गोमंतकीय टॅक्सीवाल्यांनी मीटरचा वापर करावा असे आवाहन गुदिन्हो यांनी केले आहे. टॅक्सीवाल्यांनी मीटर बसवून न घेतल्यास राज्यात ओला व उबरच्या टॅक्सी येण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही गुदिन्हो यांनी गोमंतकीय टॅक्सीवाल्यांना दिला आहे.