कोमुनिदाद कायद्यात दुरुस्तीसाठी वेळ लागणार

0
11

>> महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात; मुलींनाही समान अधिकार देणार

कोमुनिदाद कायद्यात दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून, गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता कमी आहे. कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्तीनंतर मुलींनाही समान अधिकार दिला जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल दिली.

महसूल खात्याने कोमुनिदाद कायद्यात दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी पावसाळी विधानसभेत कोमुनिदाद कायदा दुरुस्ती विधेयक सादर करण्यासाठी वेळ कमी आहे. कोमुनिदाद कायद्यातील दुरुस्तीचा प्राथमिक मसुदा जारी करण्यात आला असून, संबंधितांना दुरुस्तीबाबत सूचना, आक्षेप सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. कोमुनिदाद कायद्यात मुलाला अधिकार देण्यात आलेला आहे. सरकारकडून मुलींना समान अधिकार देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे, असेही त्यांनी सांगितले.