येथील हवामान विभागाने आज मंगळवार दि. २० व उद्या बुधवार दि. २१ जून २०२२ रोजी राज्यातील एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता काल वर्तविली आहे. उद्या दि. २१ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या २३ जूनपर्यंत राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, सूचना करण्यात आली आहे.
राज्यात मोसमी पावसाचे प्रमाण अजूनपर्यंत कमीच आहे. आत्तापर्यंत मोसमी पावसाचे प्रमाण ४४ टक्के कमी नोंद झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत केवळ चार दिवस चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ११.७५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत
१.३८ इंच पाऊस
राज्यात चोवीस तासांत एकूण १.३८ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे सर्वाधिक ३.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे २.५२ इंच, म्हापसा येथे १.९७ इंच, मडगाव येथे १.९३ इंच, फोंडा येथे ०.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी, जुने गोवा, साखळी, दाबोली, मुरगाव, सांगे येथे पावसाचे प्रमाण कमी आहे.