येथील आझाद मैदानावर गेले २२ दिवस बडतर्फीच्या विरोधात आवाज उठविणार्या ७ अंगणवाडी सेविकांनी आमरण उपोषणाला कालपासून सुरुवात केली. राज्यात अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार्या ७ अंगणवाडी सेविकांना बडतर्फ करण्यात आले आहे. राज्य सरकारने सूडबुद्धीतून बडतर्फीची कारवाई केली आहे, असा आरोप या अंगणवाडी सेविकांकडून केला जात आहे. येथील आझाद मैदानावर २२ दिवस साखळी उपोषण करणार्या या बडतर्फ अंगणवाडी सेविकांची सरकारकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने अखेर आमरण उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.