राहुल गांधींमागील ईडीचा ससेमिरा थांबेना

0
13

नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काल सलग तिसर्‍या दिवशी राहुल गांधींची चौकशी करण्यात आली. काल दिवसभरात ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. सोबतच गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी ईडी अधिकार्‍यांना यंग इंडियन ही नफा मिळवणारी कंपनी नसून, कंपनी कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार समाविष्ट केल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी ईडीला ‘यंग इंडियन’कडून आपण एकही पैसा घेता नसल्याचे सांगितले.