देशभरात २४ तासांत कोरोना रुग्णांत वाढ

0
11

देशात कोरोनाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होता आहे. गेल्या २४ तासांत ८५८२ नवीन कोरोना रुग्ण सापडले असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच गेले काही दिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या धोक्याचा अंदाज वर्तवला आहे. देशात शनिवारी दिवसभरात ४ हजार ४३५ रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. सध्या एकूण ४४ हजार ५१३ जणांवर उपचार सुरू आहेत.