१५ राज्यांतील ५७ जागांपैकी ११ राज्यांतील ४१ जागांवर खासदारांची निवड बिनविरोध झाली. त्याचवेळी ४ राज्यांतील १६ जागांवर काल मतदान झाले. राजस्थानमधील ४ पैकी ३ जागा कॉंग्रेसला, तर एक जागा भाजपला मिळाली. कर्नाटकातील ४ पैकी ३ जागा भाजपला, तर एक जागा कॉंग्रेसला मिळाली. दरम्यान, महाराष्ट्र व हरयाणातील जागांसाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
ज्या ४१ जागांवर खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडसह ११ राज्यांच्या जागांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून येणार्या उमेदवारांमध्ये कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि राजीव शुक्ला यांचा समावेश आहे.