गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा ४ जुलैपासून घेतली जाणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा म्हापसा येथील जनता विद्यालय आणि मडगाव येथील होली स्पिरिट विद्यालय या दोन केंद्रावर घेतली जाणार आहे. या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने २० जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १६ जुलैपासून घेतली जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.