राज्यातील बेकायदा मसाज पार्लर्सवर कारवाई सुरू

0
26

परवान्यांशिवाय राज्यात सुरू असलेल्या बेकायदा मसाज पार्लर्सवर कालपासून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी कळंगुट किनार्‍याला भेट दिल्यानंतर राज्यातील बेकायदा मसाज पार्लर्सवर कारवाई करण्याचे जाहीर केले होते. काल म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली हणजूण येथे गेल्या चार वर्षांपासून बेकायदेशीररित्या चालवण्यात येणार्‍या होली बासिल या मसाज पार्लरवर छापा टाकला. यावेळी ते मसाजसाठी वापरल्या जाणार्‍या तेलाच्या बाटल्यांसह अन्य साहित्य जप्त केले. हे मसाज पार्लर चालवणार्‍या आरोगराज नामक तमिळी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.