वित्त सचिवपदी व्ही. कान्डावेलस

0
17

राज्य सरकारने एका आदेशाद्वारे प्रधान सचिव डॉ. व्ही. कान्डावेलस (आयएएस) यांची वित्त सचिवपदी नियुक्ती केली आहे, तर मिनिनो डिसोझा (आयएएस) यांची पंचायत सचिवपदी नियुक्ती केली आहे.

गोवा नागरी सेवेतील अधिकारी नारायण गाड यांची अबकारी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल देसाई यांच्याकडे पर्यटन खात्याचे संचालकपद आणि पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. नियोजन आणि सांख्यिकी खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा खात्याचे संयुक्त संचालक विजय सक्सेना यांच्याकडे देण्यात आला आहे. या खात्याचे संचालक डॉ. वाय. दुर्गाप्रसाद सेवानिवृत्त झाले आहेत.

संजीव गावस देसाई यांची लॉटरी खात्याचे ओएसडी, प्रवीण बरड यांची दक्षिण गोवा आरडीए, तर केदार नाईक यांच्याकडे उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी ३ चा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंत्ता प्रमोद बदामी यांना सहा महिन्यांची सेवावाढ देण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश काल जारी करण्यात आला. बदामी यांना १ जून ते ३० नोव्हेंबरपर्यंत सेवावाढ दिली आहे.