चंदगड-कोल्हापूर येथील ११ पर्यटकांना मारहाण व छळ केल्या प्रकरणी मंगळवारी आणखी तीन महिलांना अटक करण्यात आली. या प्रकरणी यापूर्वी तीन तरुणांना अटक केली आहे. या सर्वांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. म्हापसा येथे या ११ पर्यटकांना थांबवून त्यांना चांगल्या रेस्टॉरंटमध्ये नेण्याच्या बहाण्याने पार्लरमध्ये नेत त्यांना अमानुष मारहाण केली होती. दरम्यान, पर्यटकांना लुटणार्या तीन महिलांसह सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली. मंगळवारी म्हापसा पोलीस स्थानकात दाखल होत खंवटे यांनी निरीक्षक परेश नाईक यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली.