पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. पंतप्रधानांशी झालेल्या या भेटीत राज्यातील विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मोदी यांचे गोवा राज्याच्या विकासासाठी मार्गदर्शन घेण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसर्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी यांची प्रथमच भेट घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत नवी दिल्ली दौर्यात काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे.