इंडोनेशियाने कच्च्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीची गुरूवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय घाऊक बाजारपेठेत पामतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीतील घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली असून चार दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किंमती आठ रुपये प्रतिलिटरने वाढल्या आहेत. मात्र ही दरवाढ काही काळासाठी असण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियाच्या बंदीनंतर खाद्यतेलाची आयात बंद झाल्यामुळे अधिक त्रास युक्रेन-रशिया संकटामुळे जाणवत आहे. युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तेथून सूर्यफुलाच्या तेलाची आयात फारच कमी म्हणजे नगण्य आहे. यामुळे इतर खाद्यतेलांवरही त्याचा परिणाम होत आहे.