प्रतापसिंह राणेंच्या दिमतीसाठी कर्मचारी नियुक्तीला मान्यता

0
26

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने कॅबिनेट दर्जा दिलेल्या माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दिमतीसाठी कर्मचार्‍यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. तसेच, नवीन गोवा पोलीस नियमावली २०२२ ला य बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील कॅसिनो व्यावसायिकांना वार्षिक शुल्क भरण्याबाबत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी कॅसिनो व्यावसायिकांना एकदाच शुल्क भरावे लागत होते. या निर्णयामुळे आता कॅसिनो व्यावसायिक दर महिन्याला शुल्क भरू शकतात. तसेच, त्यांना दरमहिना अतिरिक्त १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काश्मीर फाईल या चित्रपटाला देण्यात आलेल्या जीएसटी कर सवलतीला देखील मान्यता देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.