कॉंग्रेस पक्ष प्रवेशास प्रशांत किशोरांचा नकार

0
26

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसने आता २०२४ ची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षात अनेक बदल सुचवण्यात आले असून, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस कमिटीत येण्यास नकार दिला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०२४ साठी एक कृती गट तयार केला होता. प्रशांत किशोर यांनाही या गटाचा भाग बनून सर्व जबाबदार्‍या स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसची ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे.