गोमंतकीय युवा दिग्दर्शक साईनाथ उसकईकर यांच्या ‘वाग्रो’ या लघुपटाची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘कान्स २०२२’ चित्रपट महोत्सवातील शॉट फिल्म कॉर्नर श्रेणीत निवड करण्यात आली आहे. या महोत्सवातील लघुपट कॉर्नरचा उद्देश युवा दिग्दर्शकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा आहे. वाग्रोची कान्समध्ये निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साईनाथ उसकईकर यांचे अभिनंदन केले आहे.