माल्या, नीरवला भारताकडे सोपवण्यास तयार : जॉन्सन

0
22

दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल एक मोठे वक्तव्य केले. बोरिस जॉन्सन यांना नीरव मोदी आणि विजय माल्याबाबात प्रश्न विचारला असता त्यांनी कायदा मोडणार्‍यांना ब्रिटनमध्ये थारा नाही, असे सांगितले. तसेच आम्ही नीरव मोदी आणि विजय माल्या यांना भारताकडे सोपवण्यास तयार आहोत. त्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

बोरिस जॉन्सन यांनी काल दोन्ही देशांच्या चर्चेसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी गुजरातमध्ये झालेल्या स्वागताने जॉन्सन भारावून गेले होते.

नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर बोरिस जॉन्सन म्हणाले की, तुम्ही ज्या दोन व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला आहात, त्यांना आम्ही भारतात पाठवू इच्छितो; पण काही कायद्याच्या अडचणी येत आहेत. कायदा मोडून देशात येणार्‍यांचे आम्ही कधीही स्वागत केलेले नाही.