वैद्यकीय अधिकारी मारहाण प्रकरणी आयएमएकडून निषेध

0
28

आयएमए गोवा राज्य शाखेने कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगातील वैद्यकीय अधिकार्‍याला कैद्याकडून करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. भविष्यात पुन्हा डॉक्टरला मारहाणीचे प्रकार घडू नये म्हणून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी आयएमएचे गोवा राज्य अध्यक्ष डॉ. रुफिनो मोन्तेरो यांनी काल केली. मध्यवर्ती तुरुंगातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी डॉ. मोन्तेरो यांनी केली आहे.