सोनसडोवरील कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील : राणे

0
18

सोनसडो-मडगाव येथील कचर्‍याची समस्या किती गंभीर आहे, त्याची आपणाला कल्पना आहे. ही समस्या विनाविलंब सोडवण्याची गरज असून, त्यासाठी आपण संबंधित अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक बोलावणार आहे, असे नगरविकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले. गेल्या कित्येक वर्षांपासून ही कचर्‍याची समस्या सुटू शकलेली नसून, ती सोडवण्यासाठी आपण आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.