मयडेतील खाडीत प्रौढ इसमाची उडी

0
15

मयडे-बार्देश येथील एका ५० वर्षीय इसमाने खाडीत काल दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान उडी घेतली. म्हापसा पोलीस व अग्निशमन दलाने सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. खाडीत उडी टाकणार्‍या इसमाचे नाव दिगंबर धोंड असे आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक उदय परब, पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, म्हापसा अग्निशमन दलाचे जवान विष्णू गावस, प्रेमानंद कांबळी, गिरीष गावस व अक्षय सावंत यांनी ही घटनास्थळी जाऊन बोटीतून शोधकार्य केले; पण सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नव्हता.