भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक प्रगतीचे लक्ष्य गाठण्यास मागील ८ वर्षात नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचे आपण पाहिले आहे. तसेच २०१६ पासून आर्थिक विकास दर सातत्याने घसरत आहे, असे म्हणत खासदार स्वामी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेबाबतही पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केलो. राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचे ते म्हणाले.