एका परवान्यावर १० पेक्षा जास्त दुचाकींना परवानगी द्या

0
15

उत्तर गोव्यातील रेंट अ बाईक मालकांच्या एका शिष्टमंडळाने वाहतूक खात्याच्या उपसंचालकांची काल भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. उत्तर गोव्यातील किनारी भागातील रेंट अ बाईक मालकांनी एका परवान्यावर १० पेक्षा जास्त दुचाकींना मान्यता देण्याची विनंती केली आहे. सरकारच्या सध्याच्या योजनेनुसार एका परवान्यावर जास्तीत जास्त १० दुचाकी वाहने ठेवली जाऊ शकतात. तसेच, रेंट अ बाईक दुचाकी वाहने ९ वर्षे चालविण्यात मान्यता द्यावी. सध्या सहा वर्षे रेंट अ बाईक वाहने चालविण्यास मान्यता दिली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात रेंट अ बाईक मालकांना बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. या व्यवसायावर कुटुंब चालत असल्याने नियमात शिथिलता द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.