भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबीयांतर्फे उषा मंगेशकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली. २४ एप्रिल रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये होणार्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास पंतप्रधानांनी अनुकुलता दर्शवल्याची माहिती देखील उषा मंगेशकर यांनी यावेळी दिली. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना देखील या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.