>> १७४ सदस्यांचे विरोधात मतदान
>> पाकिस्तानमधील सरकार अखेर गडगडले
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये अखेर संसदेमध्ये इम्रान खानविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खानविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. पाकिस्तानच्या इतिहासात अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री १२ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. आणि न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. इम्रान खान स्वत: या ठरावाच्या मतदानावेळी गैरहजर होते. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. त्यामुळे एकूण ३४२ सदस्यांच्या संसदेमध्ये १७४ मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच इम्रान खान यांनी संसदेतील पंतप्रधानांसाठी असलेली जागा सोडली होती.
अविश्वास प्रस्ताव ८ मार्च रोजी
विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी ८ मार्च रोजी इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला होता. देशात निर्माण झालेली आर्थिक संकटाची परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे हा ठराव मांडण्यात आला होता. मात्र, इम्रान खान यांनी यावर विरोधकांची ही खेळी म्हणजे परकीय शक्तींचा कट असल्याची टीका केली होती. अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान देखील घेण्यात येणार होते. मात्र, त्याच दिवशी पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी हा ठरावच अवैध ठरवत ङ्गेटाळून लावला. यानंतर इम्रान खान यांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आणि राष्ट्रपती अल्वी यांनी ३४२ सदस्यांची संसदच बरखास्त करण्याची तयारी सुरू केली. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानमधील संसदेने उपाध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी मतदान पार पडले.
दुःखद दिवस ः फवाद चौधरी
इम्रान खान यांच्या सरकारच्या पडझडीवर पाकिस्तानचे माजी माहिती मंत्री ङ्गवाद चौधरी यांनी, आजचा दिवस पाकिस्तानसाठी दुःखाचा दिवस आहे. अलीकडेच पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानातून निरोप देण्यात आला आहे. त्यांच्यासारखा नेता मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हटले.
परकीय चलन कमी
जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आयात बिल, रोखे उत्पन्नात वाढ आणि इतर कारणांमुळे देशाचा परकीय चलन साठा कमी होत आहे. स्टेट बँक ऑङ्ग पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार, परकीय चलनाच्या साठ्यात ६.०४ टक्क्यांनी घट झाली आहे.
अविश्वास ठरावाआधी…
पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठरावावर सकाळपासूनच काम सुरू झाले. सकाळी १० च्या सुमारास हा अविश्वास ठराव मांडण्यात आला. दुपारी १२च्या सुमारास सुरू झालेली मतदान प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. पण ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच संसदेचे अध्यक्ष असद कैसर आणि उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला. त्यांच्यानंतर विरोधी पक्षातील नेते अयाज सादिक यांनी हंगामी अध्यक्षपद भूषवले.
नव्या सरकारसमोर आव्हाने
नवीन सरकारमध्ये पंतप्रधान कोण असतील याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असली तरी या नव्या सरकारसमोरील आव्हाने खूप कठीण आहेत. नव्या सरकारला आर्थिक आघाडीसह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे नव्या सरकारला हे जड जाणार आहे. गेल्या काही काळापासून देशात सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेचा परिणाम आर्थिक घडामोडींवर झालेला आहे.
भारतासोबतचे संबंध बिघडले
२०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानात सत्तेवर आल्यानंतर त्यांचे भारतासोबतचे संबंध आणखीच बिघडले. ङ्गेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४० जवान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले होते. यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली. या कारवाईने केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. दुसर्या दिवशी, पाकिस्तानने भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले, तरीही भारताच्या दबावाखाली त्यांना सोडावे लागले.