श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी

0
23

भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरत आहेत. काल रविवारीदेखील तरूणांचा मोठा समूह राजपक्षे यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र कोलंबो येथे दिसून आले.

अशातच देशातील मोठ्या व्यापारी समुदायानेही राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा काढून घेण्यास सुरुवात केल्याने राजपक्षे यांच्यावरील दबाव वाढला आहे. १९४८ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंकेतील २२ दशलक्ष लोकांना पहिल्यांदाच अशा भीषण मंदीचा सामना करावा लागत आहे. गोताबया राजपक्षे यांच्या विरोधात देशात प्रचंड रोष निर्माण झाला असून यातच मोठ्या संख्येने लोकांनी राष्ट्रपती सचिवालयाला वेढा घातला आहे. राजपक्षे यांच्याविरोधात अनेक लोक ङ्गलक घेऊन निदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे.