तांत्रिक शिक्षण संचालनालयाने गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) २०२२ च्या तारखेमध्ये बदल केला असून, ही परीक्षा आता येत्या २७ व २८ जून रोजी घेतली जाणार आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जीसीईटी परीक्षा ११ व १२ मे रोजी घेण्याचे जाहीर केले होते; मात्र आता या तारखेत बदल करण्यात आला आहे. जीसीईटी परीक्षेबाबत सविस्तर माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी जीसीईटी परीक्षा घेतली जाते.