दहावी-बारावीची परीक्षा आजपासून

0
22

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या दुसर्‍या सत्रातील परीक्षेला मंगळवार दि. ५ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. शिक्षण मंडळाने या शैक्षणिक वर्षापासून दहावी आणि बारावीची परीक्षा दोन सत्रात घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सत्रातील परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला २० हजार ५९४ विद्यार्थी बसणार आहेत, तर बारावीच्या परीक्षेला १८ हजार २१५ विद्यार्थी बसणार आहेत.