म्हादई नदीत बुडून सूर्यकांत तुकाराम गावकर (३२) या भिंरोडा सत्तरी गोवा येथील युवकाचा मुत्यू झाला. सदर युवक शनिवारपासून बेपत्ता होता. वाळपई पोलीस स्थानकात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. सूर्यकांत हा शनिवारी घरातून बाहेर पडला होता. पण तो घरी परत आलाच नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू होती. काल रविवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह म्हादई नदीत तरंगताना दिसला. मृतदेह वाळपई अग्निशामक दलाने सदर मृतदेह बाहेर काढला. वाळपई पोलिसांनी पंचनामा केला. तुकाराम याने आत्महत्या केली की तो बुडाला हे निश्चित समजू शकले नाही. सूर्यकांत हा खासगी कामाला होता. भिंरोडा सत्तरी येथे गेली काही वर्षे बुडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढले असून या ठिकाणी नऊ जणांचे बळी गेले आहेत.