येथील मांडवी जुन्या पुलावरून काल दुपारी १२ च्या सुमारास ऐन रहदारीच्या वेळी एका महिलेने नदीत उडी घेतली. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशामक दलाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीच्या पात्रातून त्या महिलेला बाहेर काढून बांबोळी येथील इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषित केले. सदर महिलेचे नाव मारिया ब्रांगाझा (५० वर्षे, रा. म्हापसा) असे आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.