गोवा भाजपची महिला मोर्चा राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीची घोषणा लवकरच केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. भाजप महिला मोर्चाची राज्य कार्यकारिणी नव्याने स्थापन करण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे, असेही तानावडे यांनी म्हटले आहे. भाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी शीतल दत्तप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत होती. गोवा विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शीतल नाईक यांनी ताळगाव मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचा आरोप भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केला होता.