पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने या संदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली. सहावी ते बारावीपर्यंतच्या इयत्तांसाठी अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आला आहे, असे वाघानी यांनी सांगितले.