…म्हणून पराभूत झालो कॉंग्रेस उमेदवारांनी सांगितली पराभवाची कारणे

0
26

कॉँग्रेसने विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची काल बैठक घेऊन त्यांच्याकडून पराभवाची कारणे जाणून घेतली.
कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात कॉँग्रेस पक्षाच्या काही जणांनी काम केल्याने पराभव पत्करावा लागला, प्रचारासाठी कमी वेळ मिळाला, मतविभागणी आदी कारणे पराभूत उमेदवारांनी बैठकीत सांगितली.
पराभूत उमेदवारांना पक्षविरोधी कारवायांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे, असे दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.