उत्तराखंडमध्ये भाजपचा गड आला; पण सिंह गेला

0
11

>> मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी पराभूत

उत्तराखंडमध्ये भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत ७० पैकी तब्बल ४७ जागांवर विजयश्री खेचून आणली. उत्तराखंडमध्ये विजय संपादन केला असला तरी भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भाजपसमोर मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरा निवडण्याची वेळ आली आहे. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसने १९ जागावर विजय मिळवला.

उत्तराखंड विधानसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. हीच आघाडी कायम ठेवत भाजपने ४७ जागांवर विजय मिळवला. पक्षाला विजय मिळाला असला तरी विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना खटिमा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसचे उमेदवार तथा प्रदेशाध्यक्ष भुवन कापडी यांनी त्यांचा ६९५१ मतांनी पराभव केला.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. लालकुंआ मतदारसंघातून मोहन सिंग बिष्ट यांनी त्यांना पराभूत केले.