गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. १० मार्च रोजी होणार असल्याने या दिवशी सकाळपासून मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी काढला आहे. त्यामुळे मद्यविक्रीचा परवाना असलेली राज्यातील सर्व मद्यालये गुरुवारी मतमोजणी संपेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत. बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेली दुकाने फक्त जेवण देण्यासाठी खुली ठेवण्यास मान्यता आहे. तथापि बार काऊंटर मात्र या दिवशी बंद ठेवावे आणि मद्याची विक्री करू नये. बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या मालकांनी फक्त जेवण मिळेल, असा फलक बाहेर लावावा, असेही आदेशात म्हटले आहे.