पाचही राज्यांतील निवडणुका काल संपल्या असून, आता या आठवड्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १४० डॉलरच्या पार गेल्या असून, त्यांनी मागील १३ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. परिणामी पेट्रोल-डिझेल १५ रुपयांची महागण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केली होती. तसेच काही राज्यांनी देखील कर कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर १० ते १५ रुपयांनी कमी झाले होते. पाच राज्यांतील निवडणुकीमुळे गेल्या चार महिन्यांपासून इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.