सुनीथ रॉड्रिग्स यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

0
29

माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) तथा पंजाबचे माजी राज्यपाल सुनीथ रॉड्रिग्स यांच्या पार्थिवावर काल सांतईनेज येथील स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि लष्करी अधिकार्‍यांनी रॉड्रिग्स यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.