राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १९ कोरोनाबाधित आढळून आले असून, एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या १८१ पर्यंत खाली आली आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यात मागील चोवीस तासांत आणखी ३० जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३६ टक्के एवढे आहे.